swandi berde 1

तिने फोटो शेअर करत लिहिले की, श्री आणि सौ. माने. माझ्या नवीन प्रोजेक्टबाबत तुमच्यासोबत शेअर करताना मी खूप आनंद होत आहे. नवीन नाटक धनंजय माने इथेच राहतात.. लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय.

  दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती इन्स्टाग्रामवर नेहमी आपले स्टाईलीश लूकमध्ये फोटो शेअर करत असते. अनेकदा तीच्या फोटोमुळे चर्चेत येते. सध्या स्वानंदीच्या एका पोस्टची तुफान चर्चा सोशल मीडियावर होतेय. स्वानंदी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती लवकरच नाटकात पदार्पण करत असून तिच्या पहिल्या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. धनंजय माने इथंच राहतात.. असं या नाटकाचे नाव आहे.  या नाटकात स्वानंदी सौ. मानेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

  स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिचे आगामी नाटक धनंजय माने इथंच राहतातच्या प्रयोगाच्या तारखा सांगितल्या आहेत. सर्वात आधी १९ मार्चला तिच्या या नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडणार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

  काय आहे स्वानंदीच्या पोस्टमध्ये

  तिने फोटो शेअर करत लिहिले की, श्री आणि सौ. माने. माझ्या नवीन प्रोजेक्टबाबत तुमच्यासोबत शेअर करताना मी खूप आनंद होत आहे. नवीन नाटक धनंजय माने इथेच राहतात.. लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय.

  View this post on Instagram

  A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde)

  या आधी स्वानंदी एका मुलाबरोबर शेअर केलेल्या पोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोला दिलेलं कॅप्शन सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र लगेचच तिची आई प्रिया बेर्डे या अफवा असल्याचं स्पष्ट केलं.