प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री, चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

नुकतेच या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असून मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.

    दोन दिवसापासून ‘हे आपलं काळीज हाय’ या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर जनतेने या ‘हे आपलं काळीज हाय’ टॅगलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यांचे काळीज कोण आहे याचा देखील उलगडा कमेंट बॉक्स मध्ये केला आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ ही टॅगलाईन ‘143’ चित्रपटाची असून चित्रपटात कोण कोणाचे काळीज आहे हे ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ तर्फे आणि  विरकुमार शहा निर्मित ‘143’(हे आपलं काळीज हाय) या प्रेममय भावना व्यक्त करणाऱ्या चित्रपटातून लवकरच उलगडणार आहे. नुकतेच या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असून मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.

    दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपटाचे पोस्टर हे प्रेमबद्ध कथेला बांधून ठेवणारे आहे हे पोस्टर पाहताच लक्षात येते. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी आगळ्यावगेळ्या दाक्षिणात्य पद्धतीने चित्रित केलेल्या या चित्रपटात कोणत्या कलाकारांना संधी दिली असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.