वरिना हुसैन करतेय आमिर खानला कॉपी, सोशल मीडिया संदर्भात घेतला तोच निर्णय!

वरिनाच्या या घोषणेने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वरिनाने मागील वर्षीदेखील सोशल मीडियापासून एका महिन्याचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर परतली होती.

  बॉलिवूड अभिनेत्री वरिना हुसैन सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे अनेक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु, आता तीने एक मोठी घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वरिनाने सोशल मीडियावरून रजा घेतली आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आमिर खानने सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर वरिनाने त्याच्या पावलावर पाउल ठेवत हा निर्णय घेतला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain)

  वरिनाच्या या घोषणेने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वरिनाने मागील वर्षीदेखील सोशल मीडियापासून एका महिन्याचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर परतली होती. नुकतीच एक पोस्ट शेअर करत वरिनाने म्हटलं, ‘मला आठवतंय मी कुठेतरी वाचलंय की तुमच्या जाण्याची घोषणा इथे करू नका कारण हे काही विमानतळ नाही. पण मी माझ्या जाण्याची घोषणा करणार आहे ते सुद्धा माझ्या चाहत्यांसाठी आणि मित्रांसाठी ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं. ही माझी शेवटची मीडिया पोस्ट आहे, यानंतर माझं अकाउंट सुरू राहील आणि माझी टीम माझ्या कामाबद्दल यावर पोस्ट करेल.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain)

  ‘आमिर सरांच्या भाषेत सांगायचं तर अजून ढोंग नाही करू शकत.’ असं म्हणत तिने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.