ronit roy

रोमांच‍क थ्रिलर्सच्या यादीमधील नवीन भर 'कँडी' या सिरीजमध्‍ये मादक पदार्थ, राजकारण, महत्त्वाकांक्षा व हत्‍या यांचे सुरेख मिश्रण असलेल्‍या कथा प्रेमळ व कपटी कारस्‍थानाला दाखवतात. पण या कारस्‍थानामागे हात असलेली व्‍यक्‍ती किंवा पशूबाबत कोणीच सांगू शकत नाही. डोंगराळ भागातील एका बोर्डिंग स्‍कूलमध्‍ये स्थित सिरीज 'कँडी'मध्‍ये अॅक्‍शन, रोमांच आणि अचंबित करणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. रिचा चड्डा व रोनित रॉय यांची प्रमुख भूमिका असलेली सिरीज 'कँडी' निश्चितच प्रेक्षकांना रहस्‍यांचा उलगडा करण्‍याच्‍या रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल.

यंदाचे वर्ष वेब विश्‍वातून सादर केल्या गेलेल्‍या कन्‍टेन्‍टच्‍या बाबतीत अद्वितीय राहिले आहे. २०२० मधील काही सर्वात मोठ्या शोजमध्‍ये वूट सिलेक्‍टच्‍या शोजचा देखील समावेश होता. ‘मेड फॉर स्‍टोरीज’ या तत्त्वाशी बांधील राहत व्‍यासपीठाने अनेक शैलींमधील कन्‍टेन्‍ट दाखवला आणि अपवादात्‍मक ओरिजिनल्‍स सादर केले, ज्‍यांना प्रेक्षकांकडून मोठी प्रशंसा मिळाली. उच्‍च प्रशंसित ‘असुर’मधील काल्‍पनिक व विज्ञानाचे अभूतपूर्व परिणाम किंवा पूर्णत: दूरूनच व डिजिटली शूटिंग करण्‍यात आलेली सिरीज ‘दि गॉन गेम’ किंवा मोठ्या पडद्याची जादू सादर करणारी सौम्‍य व गोंडस सिरीज ‘क्रॅकडाऊन’ अशा सर्वोत्तम सिरीजसह वूट सिलेक्‍टने उच्‍च दर्जाचा कन्‍टेन्‍ट सादर करण्‍यासंदर्भातील स्‍तर उंचावत नेला आहे. वूट सिलेक्‍टच्‍या २०२१ मधील लाइन अपबाबत उत्‍सुकता व अपेक्षा वाढली असताना व्‍यासपीठ त्‍यांच्या नवीन ओरिजिनल ‘कँडी’सह कन्‍टेन्‍ट सादरीकरण अधिक उंचावर नेण्‍यास सज्‍ज आहे.

रोमांच‍क थ्रिलर्सच्या यादीमधील नवीन भर ‘कँडी’ या सिरीजमध्‍ये मादक पदार्थ, राजकारण, महत्त्वाकांक्षा व हत्‍या यांचे सुरेख मिश्रण असलेल्‍या कथा प्रेमळ व कपटी कारस्‍थानाला दाखवतात. पण या कारस्‍थानामागे हात असलेली व्‍यक्‍ती किंवा पशूबाबत कोणीच सांगू शकत नाही. डोंगराळ भागातील एका बोर्डिंग स्‍कूलमध्‍ये स्थित सिरीज ‘कँडी’मध्‍ये अॅक्‍शन, रोमांच आणि अचंबित करणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. रिचा चड्डा व रोनित रॉय यांची प्रमुख भूमिका असलेली सिरीज ‘कँडी’ निश्चितच प्रेक्षकांना रहस्‍यांचा उलगडा करण्‍याच्‍या रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल.

याबाबत बोलताना रोनित रॉय म्‍हणाले, ”मी अनेक प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूपच नशीबवान आहे. यामुळे मला भरपूर शिकण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. डिजिटल मनोरंजन युगाच्‍या प्रारंभासह प्रत्‍येकासाठी चांगले काम आहे आणि अनेक लोक अत्‍यंत प्रेरणादायी व हृदयस्‍पर्शी काम उत्तमप्रकारे करत आहेत. माझ्या मते, अनेक संधी आहेत आणि या संधी वाढतच जातील. मला काही सर्वोत्तम ओटीटी शोजचा भाग असण्‍याचा अभिमान वाटतो. आता मी सिरीज ‘कँडी’साठी काम सुरू करण्‍यास उत्‍सुक असून त्याची वाट पाहत आहे. मी अशी प्रबळ संकल्‍पना घेऊन येण्‍यासाठी वूट सिलेक्‍टच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानतो. माझी भूमिका जटिल व आव्‍हानात्‍मक आहे, ज्‍यामुळे संपूर्ण पटकथा अधिक रोमांचक बनते. माझा विश्‍वास आहे की, ही सिरीज एक रोमांचपूर्ण राइड असणार आहे आणि मी ही सिरीज तुमच्‍यासमोर सादर होण्‍यासाठी अत्‍यंत उत्सुक आहे.”

रिचा चड्डा म्‍हणाली, ”मला या पटकथेकडे आकर्षून घेतलेली बाब म्‍हणजे शोमधील माझ्या भूमिकेत असलेल्‍या विविध छटा. ही थ्रिलर/ सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्‍या भूमिका साकारण्‍याकडे मी नेहमीच आकर्षून गेले आहे आणि ही अगदी परिपूर्ण संधी होती. अर्थातच, रोनित सारख्‍या प्रतिभावान कलाकारासोबत काम करणे अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. मी पहिल्‍यांदाच त्‍याच्‍यासोबत, तसेच नकुल सहदेव, मनु रिषी चढ्डा यासारख्‍या सर्वोत्तम कलाकारांसोबत काम करत आहे. मी दिग्‍दर्शक आशिष शुक्‍ला यांच्यासोबत काम करण्‍यासाठी देखील अत्‍यंत उत्‍सुक आहे. ते माझ्या करिअरच्‍या सुरूवातीला इंडस्‍ट्रीमध्‍ये प्रथम भेटलेल्‍या काही व्यक्तींपैकी एक आहेत.”

रोनित रॉय व रिचा चड्डासोबत शोमध्‍ये मनु रिषी चढ्डा व नकुल सहदेव देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सिरीजचे दिग्‍दर्शन आशिष आर. शुक्‍ला यांनी केले असून ऑप्टिमिस्टिक्‍स एंटरटेन्‍मेंटची निर्मिती आहे.