लकी अली जिवंत की त्यांचे कोरोनाने निधन? मैत्रिणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून केला खुलासा!

गेल्या काही दिवसांपासून लकी अली हे लाइमलाइटपासून दूर आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

    कोरोनामुळे अनेक सेलेब्रेटींचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवा सुरू होत्या. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटलं जात होतं. पण लकी अली यांची मैत्रीण नफीसा अलीने ट्विट करत या अफवांवर पडदा टाकला आहे. या अफवा खोट्या असल्याचं तिने म्हटलं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून लकी अली हे लाइमलाइटपासून दूर आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ते सर्व पाहून लकी अली यांची मैत्रीण नफीसा अलीने ‘लकी एकदम ठिक आहे आणि आज दुपारीच आमचे बोलणे झाले आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठिक आहे’ असे म्हटले आहे.

    लकी अली सध्या त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये व्यग्र आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्ट बद्दल देखील बोललो होतो. तो बंगळूरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. मी काही वेळा पूर्वीच त्याच्याशी बोलले आणि तो एकदम ठिक आहे’ असे नफीसा म्हणाली.