‘चित्रपटात काम करणार का?’ असं मधुर भंडारकरांनी विचारताच निरज चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.

  भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. निरजच्या या गोल्डन कामगिरीमुळे एक इतिहास रचला. देशभरात निरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सेलेब्रेटींनी सुद्धा नीरजचं तोंडभरून कौतुक केलं आहे. याचदरम्यान चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली. त्यामुळे आता लवकरच हे दोघं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

  याविषयी बोलताना मधुर भांडारकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनानिमित्त मी दिलील होतो. त्यामुळे मी टोक्यो ऑलिम्पिकमधील स्पर्धकांची भेट घेतली. आणि कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. मी नीरजला म्हणालो तू सुपरस्टार झाला आहे. देशभरात तुझे लाखो चाहते आहेत. तू गुड लुकींग आहेस, चित्रपटात काम करण्याचा काही विचार केला आहेस का? यावर नीरज मला अभिनय करण्याची इच्छा नाही असं म्हणाला.

  भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.