पुन्हा हसवायला तयार… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने घेतला कोरोना लसीचा डोस!

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि त्यांना हसवत आहेत. या कठीण काळात हास्यजत्रा हि टेन्शनवरची मात्रा ठरत आहे.

    सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमने मालाड येथील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये कोरोनाची लस घेतली. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना लस देण्यात आली.

    महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि त्यांना हसवत आहेत. या कठीण काळात हास्यजत्रा हि टेन्शनवरची मात्रा ठरत आहे.

    हे कलाकार आता मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच हास्यजत्रेच्या शूटींगला सुरूवात होईल.