‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, होणार आणखी खास, या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार धमाल स्किट्सची मेजवानी

सगळ्यांची लाडकी 'अग अग आई' ही स्किट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण ट्विस्ट असा आहे की आई रागावून घर सोडून गेलीये आणि बाबा आणि ओंक्या हे दोघेच घरात आहेत आता या दोघांमध्ये काय होत आणि आई परत येते की नाही हे बघणं प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.

  महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळ्यांची लाडकी आहे. गेल्या काही काळात हास्यजत्रेने प्रेक्षकांचे टेन्शन दूर करून त्यांना मनसोक्त हसायला भाग पाडले आहे. हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातील कलाकार सर्वांचे लाडके आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने घराघरातच नाही तर मनामनात आपली जागा निर्माण केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  सध्या सगळीकडे आयपीएलचा गाजावाजा आहे अशात आपल्या गल्ली क्रिकेटला विसरून चालणार नाही. आणि अशीच एक भन्नाट स्किट प्रेक्षकांसाठी प्रसाद, गौरव मोरे, पॅडी, ओंकार भोजने, पृथ्वीक प्रताप आणि निखिल बने हि मंडळी घेऊन येणार आहेत या आठवड्यात. तर सगळ्यांची लाडकी ‘अग अग आई’ ही स्किट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण ट्विस्ट असा आहे की आई रागावून घर सोडून गेलीये आणि बाबा आणि ओंक्या हे दोघेच घरात आहेत आता या दोघांमध्ये काय होत आणि आई परत येते की नाही हे बघणं प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)