स्त्री वेशात खूप सुंदर दिसतोय ‘हा’ अभिनेता, ‘साडी नेसून स्त्री होता येत नाही’ असं कॅप्शन देत शेअर केला फोटो, चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव!

महिला दिनाचे निमित्त साधत त्यांनी हा फोटो शेअर केला असून त्याला समर्पक असं कॅप्शनही दिली आहे. या फोटोची आणि कॅप्शनची चर्चा रंगली आहे.

  आपल्या अभिनय आणि कॉमेडीमुळे सरिकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे समीर चौगुले. सोशल मीडियावर समीर चौगले प्रचंड सक्रीय आहे. तो सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो फॅन्सशी संवाद साधत असतो. तो आपले फोटो आणि व्हिडिओ देखील चाहत्यांसाठी शेअर करत असतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

  नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे. यांत समीर स्त्रीवेष परिधान केला आहे.  त्यांनी साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा समीर आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

  महिला दिनाचे निमित्त साधत त्यांनी हा फोटो शेअर केला असून त्याला समर्पक असं कॅप्शनही दिली आहे. हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, फक्त नटून साडी नेसून स्त्री होता येत नाही…आयुष्यभर “गृहीत” धरल्या गेलेल्या गृहिणींना, पाहुणे आल्यावर “मी नंतर जेवायला बसते” हा निर्णय अगदी सहज घेणाऱ्या बायकोला, रोजच्या खर्चातून थेंब भर पैसे रोज तांदळाच्या डब्यात साठवणाऱ्या आईला, ट्रेन मधून घरी जाताना रात्रीच्या जेवणाची भाजी निवडणाऱ्या वहिनीला…..आणखीन किती उदाहरणं देऊ… महिलांनो स्वतःसाठी ही जगा…जगातल्या प्रत्येक महिलेला….सलाम…..स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे आणि राहणार………जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Samir Choughule (@samirchoughule)