कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ रंगणार आठवड्यातील चार दिवस!

कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानी सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या.

  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे.  हास्यत्रेचे ३०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत हास्यजत्रा नेहमीच नशीबवान ठरली आहे. आता ही हास्यजत्रा आठवड्यातले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानी सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या. नव्या-जुन्या विनोदवीरांच्या एकत्रित सादरीकरणानी यातल्या सर्वच कलाकारांना आणि विनोदवीरांच्या सर्व जोड्यांना महाराष्ट्रानी डोक्यावर घेतलं आहे. अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, प्रभाकर मोरे ह्या अनुभवी विनोदवीरांबरोबर गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, श्यामसुंदर राजपूत, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, निमिष कुलकर्णी हे सर्व कलाकार आज मराठी रसिकांचे लाडके झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  कोवीड काळात अस्वस्थ असलेल्या लोकांना, रुग्णांना, कोवीड योद्ध्यांना, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस अशा अनेकांना या कार्यक्रमानी दोन घटका रमवलं, हसवलं. या कार्यक्रमामुळे त्यांना काही क्षण आपल्या त्रासाचा, दुःखाचा, वेदनेचा विसर पडला, आणि या कार्यक्रमाचं हे खूप मोठं यश आहे. दोन दिवस हास्यजत्रा पाहून प्रेक्षकांचं  भरपूर मनोरंजन व्हायचं. आता तर टेन्शनवरची ही मात्रा ४ दिवस मिळणार आहे. कॉमेडीच्या या चौकारानं प्रेक्षकांचं टेन्शन नक्कीच तडीपार होणार!! .पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोम.-गुरु., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.