महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील ‘ही’ अभिनेत्री करणार हिंदी मालिकेत पदार्पण, प्रोमो पाहून चाहत्यांनी केलं कौतुक!

या सिटकॉममधले कलाकार खूप छान आणि मनमोकळे आहेत. शूटिंग करताना मधल्या विश्रांतीच्या वेळेत खूप मजा येते. सेटवर खूप खेळीमेळीचे वातावरण असते आणि सगळेजण हास्यविनोद करत असतात.

  पाय इन द स्काय, व्हॉट्सअॅप लव्ह आणि वेक अप मधील भूमिकांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री शिवाली परब आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर अलीकडेच सुरू झालेल्या सरगम की साढेसाती या सिटकॉममध्ये गुड्डीच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती गुड्डीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गुड्डी ही अवस्थी कुटुंबात कामाला आलेली एक नवी मुलगी आहे. केवळ सरगमने छेदीलाल अवस्थी (सरगमचे सासरे) यांच्याकडे शब्द टाकल्यामुळे सरगमला घरकामात मदतीसाठी एक कामवाली ठेवण्याचे छेदीलाल अवस्थी यांनी मान्य केले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)

  सरगम की साढेसाती मालिका एका संयुक्त कुटुंबात घडणार्‍या गंमती जमती आणि धमाल मस्ती दर्शविते. अवस्थी एक अतरंगी परिवार आहे. या कुटुंबात साडेसात पुरुष आणि केवळ एकच स्त्री आहे, जी या सगळ्या पुरुषांची काळजी घेते. या सदस्यांच्या विक्षिप्तपणामुळे कधी कधी सरगम खूप हैराण होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)

  सरगम की साढेसातीच्या कलाकार संचात दाखल होण्याचा आपला आनंद व्यक्त करताना शिवाली म्हणते, “हिंदी टेलिव्हिजनवर मी पहिल्यांदाच काम करत आहे आणि नवीन लोकांबरोबर काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. सरगम की साढेसाती मालिकेचा एक भाग होताना मला खूपच रोमांचित वाटते आहे. मालिकेत मी साकारत असलेली गुड्डी ही व्यक्तिरेखा खूपच उत्साही आणि बडबडी आहे. ती एक मस्त मुलगी आहे, आणि अवस्थी कुटुंबात सरगमला दैनंदिन कामात मदत करण्यासाठी तिला कामावर ठेवण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)

  या सिटकॉममधले कलाकार खूप छान आणि मनमोकळे आहेत. शूटिंग करताना मधल्या विश्रांतीच्या वेळेत खूप मजा येते. सेटवर खूप खेळीमेळीचे वातावरण असते आणि सगळेजण हास्यविनोद करत असतात.” ती पुढे म्हणते, “माझ्यामुळे या मालिकेत एक वळण येणार आहे आणि मला खात्री आहे की त्याबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता असेल. मला ही संधी दिल्याबद्दल सोनी टीव्हीची मी आभारी आहे.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)