shweta turkul

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा सोनी मराठी वाहिनीवरला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.  यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेलं टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. डान्सचा टॉप गियर धर्मेश सर आणि मिस कलरफूल पूजा सावंत या कार्यक्रमाचं परीक्षण करताहेत.

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा सोनी मराठी वाहिनीवरला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.  यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेलं टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. डान्सचा टॉप गियर धर्मेश सर आणि मिस कलरफूल पूजा सावंत या कार्यक्रमाचं परीक्षण करताहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंट या कार्यक्रमात आलं आहे त्यातलीच एक श्वेता टुरकुल हिनं  बोन ब्रेकिंग या अजब स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्वेता प्रमाणेच इतर डान्सर्स सुद्धा या कार्यक्रमात आपल्या नृत्याची चुणूक दाखवत आहेत. श्वेता ही मुंबईची असून गेली ७-८ वर्षं ती नृत्य करते आहे. तिची हाडं अतिशय लवचीक असल्यानं ती बोन ब्रेकिंग ही स्टाईल करू शकते. या कार्यक्रमात भाग  घेऊन तो  जिंकणं हे  तिचं स्वप्न आहे. खरं तर स्वप्नापेक्षा जास्त ती तिची गरज आहे.  मध्यमवर्गीय कुटुंबातल्या श्वेताच्या  कुटुंबीयांची घरं घेताना  फसवणूक झाली आणि राहतं घर सोडून त्यांना भाड्याच्या घरात स्थायिक व्हावं लागलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

 

दरम्यान लॉकडाऊन झालं आणि घरात येत असलेल्या पैशांचा मार्गही थांबला. घरभाडं आणि घरातला खर्च यांमध्ये श्वेताला  आपलं डान्सचं स्वप्न बाजूला ठेवून घरच्यांसाठी उभं राहावं लागलं.  डान्स कायमचा सोडून देणं श्वेताला मान्य नाही आणि म्हणून तिनं  तिला मिळालेला हा चान्स घेतला आहे. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये तिची निवड टॉप १२ मध्ये झाली आहे. तिचा हा प्रवास कसा होतो आणि तिची स्वप्नं पूर्ण होतात का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

श्वेता टुरकुलच्या तोडीस तोड असलेले इतर अकरा स्पर्धक  या स्पर्धेत आहेत. ही लढत आता चुरशीची होणार आहे. पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा ग्रँड प्मिप्रियर १४ आणि १५ डिसेंबर रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.