प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांना कॅन्सरचं निदान, मुंबईतील रूग्णालयात पार पडली शस्त्रक्रीया!

महेश मांजरेकरांना १० दिवसांपूर्वी मुंबईच्या एच.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  अनेक कलाकरांनी आजपर्यंत कॅन्सरवर यशस्वीपणे मात केलीये. आता यात मराठी चित्रपट- बॉलिवूड दिग्दर्शक,निर्माते, अभिनेते महेश मांजरेकरांचा देखील या यादीत सामावेश झाला आहे. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. महेश मांजरेकरांना ब्लॅडर कॅन्सरचं निदानं झालं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

  त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रीया करण्याच सल्ला दिला. नुकतीच ही शस्त्रक्रीया मुंबईतील रूग्णालयात पार पडली. नुकतचं त्यांना घरी सोडण्यात आलय. महेश मांजरेकरांना १० दिवसांपूर्वी मुंबईच्या एच.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर ही शस्त्रक्रीया पार पडली.