अजय देवगणबरोबरच्या अफेरच्या खुलाश्यानंतर अभिनेत्री महिमा चौधरीने दिग्दर्शकावर केले गंभीर आरोप!

‘परदेस’चे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी मला हा चित्रपट करण्यास नकार दर्शविला होता. मात्र, हा चित्रपट मला करायचा होता आणि यावर मी ठाम होते.

    अभिनेता शाहरूखच्या ‘परदेस’ या चित्रीपटात मुख्य भूमिका साकारत महिमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातून महिमाची तुलना ही माधुरी दीक्षितशी करण्यात आली होती. काही सुपरहिट चित्रपटांनंतर महिमा बॉलिवूड आणि लाइमलाईटपासून लांब गेली. मात्र, आता महिमा एका मुलाखतीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. त्याचबरोबर तीने राम गोपाल वर्मा यांच्याबद्दलही एक खुलासा केला आहे. राम गोपाल वर्मा यांनी तिला ‘सत्या’ या चित्रपटातून काही न सांगता काढून टाकले होतं असं महिमाने म्हटलं आहे.

    या मुलाखतीमध्ये तिने “जेव्हा मी ‘परदेस’ हा चित्रपट करत होती, तेव्हा मला ‘सत्या’ची ऑफर दिली होती. राम गोपाल वर्मा मला भेटले आणि म्हणाले की “मी एक चित्रपट करत आहे. यात एक गुंड आहे, आणि त्यात मुलीची एक भूमिका असून ती खूप मोठी अशी नाही.” मी चित्रपटाची पटकथा वाचली आणि ती मला आवडली. ‘परदेस’चे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी मला हा चित्रपट करण्यास नकार दर्शविला होता. मात्र, हा चित्रपट मला करायचा होता आणि यावर मी ठाम होते.

    ती पुढे म्हणाली, “मला निर्मात्यांनी सायनिंगची रक्कम देखील दिली होती. चित्रपटाबद्दल प्रेस कॉन्फर्संमध्ये बोलायला मी सुरू देखील केलं होतं. मात्र, ऐनवेळी मला कोणतीही कल्पना न देता राम गोपाल वर्मा यांनी माझ्या जागी उर्मिला मातोंडकरला घेतले. मी वर्तमान पत्रात वाचल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून माझ्या जागी उर्मिला असल्याचे मला समजले. ‘सत्या’ हा माझ्या करिअर मधला दुसरा चित्रपट असता.”

    पुढे महिमाने तिच्या आणि अजय देवगणच्या अफेअरच्या चर्चांमुळे खाजगी आयुष्यावर कसा परिणाम झाला हे देखील सांगितलं.