काजोलबरोबर लग्नझाल्यानंतरही अजयचं होतं ‘या’ अभिनेत्रीवर प्रेम, त्या एका घटनेमुळे रंगली अफेअरची चर्चा!

अजय देवगणसोबत प्रेमसंबंधाची चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. यावेळी तिने या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा एक किस्साही सांगितला आहे. '

  दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महिमा चौधरी एकेकाळची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. त्यावेळी अभिनेता अजय देवगण आणि महिमा चौधरी यांच्यात अफेअर  सुरू असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी अजय देवगनचं नुकतचं लग्न झालं होतं. आता याबाबत महिमाने स्वतः खुलासा केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

   

  अलीकडेच महिमा चौधरीनं पिंकविला या वेब पोर्टलाला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने अजय देवगणसोबत नाव जोडल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजय देवगणसोबत प्रेमसंबंधाची चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. यावेळी तिने या ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा एक किस्साही सांगितला आहे. ‘दिल क्या करे’ या चित्रपटात अजय देवगण आणि काजोलनं मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटात महिमानं एक छोटीशी भूमिका साकारली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

  क्लोज अप शॉट आणि अफवा

  या चित्रपटाच्या शुटींगपूर्वी महिमा चौधरीचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी काचा घुसल्यानं जखमा झाल्या होत्या. या अपघातामुळं ती बराच काळ चित्रपटापासून दूर राहिली होती. महिमानं सांगितल्यानंतरही दिग्दर्शकानं महिमाचे क्लोज अप शॉट घेतले. ही बाब महिमाला समजल्यानंतर ती दिग्दर्शकावर चिडली. यानंतर महिमा चौधरीची अस्वस्थता पाहता, अजय देवगणने तिला विचारलं तिला कारण विचारलं. यावेळी तिने क्लोज शॉटबाबत घडलेला किस्सा अजयला सांगितला. अजयला तिची काळजी वाटली. त्यामुळे त्यानेही महिमाची बाजू घेत, क्लोज अप शॉट न घेण्याची विनंती दिग्दर्शकाला केली. यानंतर दिग्दर्शकानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की, अजय देवगन महिमावर प्रेम करतो. आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली.