भावस्पर्शी नात्याला वेगळे वळण घेऊन  ‘माई’s स्पेशल’ चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला!

आईच्या त्यागाचे मोल जपणारा 'माई's स्पेशल' चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. 'काक माय एंटरटेनमेंट' निर्मित 'माई's स्पेशल' या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

    संपूर्ण विश्वात आईला कधीच पर्याय असू शकत नाही. एखादी स्त्री आईच्या जागी असू शकते, मात्र ती आई असू शकत नाही हे या नात्याचे बलस्थान आहे. आई सगळ्यांची जागा घेऊ शकते मात्र तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. सर्वगुण संपन्न अशी ही आई तिच्या अंगी असलेल्या कलागुणांची आवड हाताशी घेऊन ती तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण जगत असते. एखादा प्रसंग ओढवल्यावर त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तिच्यातले बळ जागृत होते आणि तो प्रसंग निभावून नेते ती आई असते. संसाराचा गाढा ओढता ओढता स्वतःचा विचार करण्याची खुंटलेली तिची क्षमता या संसारापायी ती करत नाही. आई कुठे काय करते? असे कित्यकेदा रागात बोलून जातो मात्र कोणतीही तक्रार न करता ती तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून ती माय वेळ निभावते मात्र त्यावेळी तिच्यातले आईपण, एक गृहिणी म्हणून मांडलेल्या संसाराला ती गालबोट लागू देत नाही. अशा या आईच्या त्यागाचे मोल जपणारा ‘माई’s स्पेशल’ चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. ‘काक माय एंटरटेनमेंट’ निर्मित ‘माई’s स्पेशल’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

    “काक माय एंटरटेनमेंट” अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे निर्मित आणि महेश कोले प्रस्तुत आई या अत्यंत भावस्पर्शी नात्याला एक वेगळे वळण घेऊन हा चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक मंगेश नरे हे या चित्रपटाची धुरा सांभाळणार आहेत. तर चित्रपटाची कथा ही लेखक किरण माने आणि नितीन सावळे लिखित आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू जसराज-सौरभ सांभाळणार आहेत. ‘माई’s स्पेशल’ चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढू लागली आहे.

    माई आपल्या मुलांच्या पाठीशी आणि संसारासाठी वेळप्रसंगी आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी तिच्यातील अवगत कलागुण कशी जोपासते याचे महत्व पटवून देणारा हा ‘माई’s स्पेशल’ चित्रपट प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा विषय नक्कीच आहे. अशा या अगाध नात्याची महती सांगणारा चित्रपट केव्हा येतोय याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.