rasika sunil

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’. ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये सुपरहिट आहे. ही मालिका टीआरपीमध्ये देखील अव्वल असते. या मालिकेतील कलाकारही नेहमी चर्चेत असतात. म त्यांचे सेटवरचे फोट, व्हिडिओ असो की मालिकेमधला एखादा प्रसंग या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मालिका बंद होणार?

या मालिकेचा जसा चाहता वर्ग आहे तसा ही मालिका आता बंद करावी हे सांगणाराही वर्ग आहे. सध्या झी मराठीवर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे प्रमो सुरू आहेत. ही मालिका ८ वाजता १४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की त्याची वेळ बदलणार ही चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.