विलगीकरणात असलेल्या रणबीर कपूरला आलिया करतेय जरा जास्तीस मिस, सोशल मीडियावर शेअर केला जूना फोटो आणि…

रणबीर सध्या कोरोनाबाधित असल्यानं गृहविलगीकरणात आहे. तर आलियाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिने काल आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    अभिनेता रणबीर कपूरला कोरोना झाल्यामुळे तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. पण आलिया त्याला जरा जास्तच मिस करतेय असं दिसतय. नुकतंच आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घरले आहेत. हा त्यांचा जुना फोटो आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. “मेजर मिसिंग” आणि एक लाल बदाम यासह तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

    रणबीर सध्या कोरोनाबाधित असल्यानं गृहविलगीकरणात आहे. तर आलियाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिने काल आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. ती म्हणते, “मी तुमचे काळजीचे आणि विचारपूस करणारे मेसेज वाचत आहे.

    माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून काही दिवस विलगीकरणात राहिल्यावर आणि माझ्या डॉक्टरांना विचारून मी आता उद्यापासून कामाला सुरुवात करत आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी माझी काळजी घेत आहे आणि सुरक्षित आहे. तुम्हीही तुमची काळजी घ्या.” या सोबतच तिने चाहत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे.

    Alia-and-Ranbir

    रणबीर आणि आलिया तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. लवकरच ते दोघे ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसतील.