स्तन झाकण्यासाठी अभिनेत्रीने केलेली फॅशन बघून बसेल आश्चर्याचा धक्का,Photo होतोय व्हायरल!

‘कान्स फिल्म फेस्टीव्हल २०२१’च्या रेड कार्पेटवर बेला हदीद हिने एक रिस्की आऊटफिट परिधान केला होता. तिच्या या रिस्की आऊटफिटसोबत त्यावर घातलेला अनोखा गोल्ड नेकलेस सुद्धा तितकाच हटके होता.

    कान्स फिल्म फेस्टीव्हल २०२१’च्या रेड कार्पेटवर अमेरिकेची सुपरमॉडेल बेला हदीदच्या नेकलेसला पाहून सगळेच अवाक झाले होते, त्याप्रमाणेच बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ मलायका अरोराला देखील तितकच आश्चर्य वाटलं आहे. मॉडेल्स नेहमीच आपल्या अनोख्या वेशभूषेने प्रेक्षकांना खूश करीत असतात. पण अमेरिकेची मॉडेल बेला हदीदचं अनोखं फॅशन पाहून सगळेच जण हैरण झालेत. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेला हदीदच्या या अनोख्या फॅशनवर मलायका अरोराने प्रतिक्रिया दिलीय.

    मलायका अरोराने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिलीय. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कान्स फिल्म फेस्टीव्हमधले बेला हदीदच्या व्हायरल फोटोंपैकी एक फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “उफ्फ्फ…आता ही फॅशन आहे..” असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने सुपरमॉडेल बेला हदीदला सुद्धा टॅग केलंय.

    ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल २०२१’च्या रेड कार्पेटवर बेला हदीद हिने एक रिस्की आऊटफिट परिधान केला होता. तिच्या या रिस्की आऊटफिटसोबत त्यावर घातलेला अनोखा गोल्ड नेकलेस सुद्धा तितकाच हटके होता. या नेकलेसचीच जास्त चर्चा रंगली. हुबेहुब फुप्फुसासारखा दिसणारा हा नेकलेस कान्सचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तिचा रिस्की आऊटफिट आणि नेकलेसची चर्चा जगभरात सुरूये.