mobile theft
प्रतिकात्मक फोटो

दोन आठवड्यांपूर्वी अंजिता अधिकारी(Anjita Adhikari) ही सिने अभिनेत्री पटना एक्सप्रेसमधून प्रवास करीत असताना सकाळी ९.३० वा.सुमारास आंबिवली ते शहाड स्टेशन दरम्यान दरवाज्यात उभ्या असलेल्या अभिनेत्रीच्या हातावर दंडुक्याच्या प्रहार करीत तिचा ५५ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने(Mobile Theft) लंपास केला होता.

    कल्याण : रेल्वेतून (Train Travel)प्रवास करीत दरवाज्यात हातातील मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल घेऊन(Mobile Theft On Railway track) पोबारा केल्याने कल्याण रेल्वे पटरीवर फटका गॅंग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसते. दोन आठवड्यांपूर्वी अंजिता अधिकारी(Anjita Adhikari) ही सिने अभिनेत्री पटना एक्सप्रेसमधून प्रवास करीत असताना सकाळी ९.३० वा.सुमारास आंबिवली ते शहाड स्टेशन दरम्यान दरवाज्यात उभ्या असलेल्या अभिनेत्रीच्या हातावर दंडुक्याच्या प्रहार करीत तिचा ५५ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने(Mobile Theft) लंपास केला होता.

    अभिनेत्री अंजिता अधिकारीने कल्याण रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तपास करत वर्तकनगर ठाणे येथून आंबिवली स्टेशन नजीक वस्ताद लहुजी साळवे नगरात राहणाऱ्या राजू केंगरे (वय २१ वर्षे) याच्याकडील ५५ हजार रूपये किंमतीचा अ‍ॅपल कंपनीच्या मोबाईल हस्तगत करीत अटक केली. आरोपी राजू केंगरे यांच्यावर मोबाईल चोरीचे ७ गुन्हे दाखल आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनवली असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दुल यांनी दिली.