नवऱ्यावर अंत्यसंस्कार करतानाचे फोटो व्हायरल होताच मंदिरा बेदी ट्रोल, कपड्यांवरून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न!

राजच्या शेवटच्या प्रवासाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत, ज्यात मंदिरा खूप रडताना दिसत आहे.

    प्रसिद्ध टीव्ही निवेदक आणि अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीच दिग्दर्शक राज कौशल यांचं अचानक ३० जून ला पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. यामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मंदिरावर यामुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मंदिराने पतीच्या मृत्यूच्या काही तास आधीच तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरीही पोस्ट केल्या होत्या. जेव्हा तिला असं काही घडेल याची चाहूल देखील नव्हती.

    राजच्या शेवटच्या प्रवासाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत, ज्यात मंदिरा खूप रडताना दिसत आहे, परंतु नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं ते मंदिराने पतीचा मृतदेहावर स्वत: अंत्यसंस्कार केले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या प्रकरणावरून वाद सुरू आहे. काही लोक मंदिराला वाईट रीतीने ट्रोल करत आहेत, तर असे काही लोकांनी रिती पंरपरा मोडल्याबद्दल तिचे कौतुक केलं आहे. चला सोशल मीडियावर प्रतिक्रिया कशी आहे ते पाहूया-