पतीच्या अचानक जाण्याने मंदिराला बसलाय जबरदस्त धक्का, घेतला एक महत्त्वाचा निर्णय!

मंदिराने तिचा इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. याजागी मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम डीपीला ब्लॅक मार्क केलंय.

    अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि बॉलिवूड फिल्ममेकर राज कौशल यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ३० जूनला पहाटे ४.३० वाजता राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील अनेकांनी राज कौशल यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

    मंदिराने तिचा इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. याजागी मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम डीपीला ब्लॅक मार्क केलंय. त्यामुळे तिच्या फोटोच्या जागी आता तिथे काळ्या रंगाशिवाय काहीच दिसत नाही. मंदिराने काहीच न बोलता अशा प्रकारे पतीच्या निधनाचा शोक व्यक्त केलाय. पतीच्या निधनाच्या एक दिवस आधीच मंदिराने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. तर यापूर्वी तिच्या डीपीला देखील मंदिराचा बोल्ड फोटो होता.

    पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली होती. अनेक वर्षाच्या परंपरा मोडत मंदिरा बेदी पतीच्या अंतिम संस्काराच्या विधी पार पाडल्या. यावरून सोशल मीडियावर अनेक युजर्सने तिचं कौतुक केलं, तर काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यात मंदिरा बेदीची बाजू घेत अभिनेत्री सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर चांगलीच भडकली होती.