मंदिराचे पती राज कौशल यांना आधीच आली होती हार्ट अटॅकची कल्पना, मित्राने केला मोठा खुलासा!

राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीत म्युझिक डाररेक्टर सुलेमान यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केलाय.

    अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं ३० जूनला पहाटे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं. राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. राज कौशल यांच्या या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान राज कौशल यांना हार्ट अटॅक येणार यांची आधीच कल्पना आली असून त्यांनी याबद्दल मंदिराला सांगितलं होतं. राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीत म्युझिक डाररेक्टर सुलेमान यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केलाय.

    सुलेमान म्हणाले, ‘२९ जूनच्या संध्याकाळीच राजला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांनी पित्ताची काही औषधं घेतली आणि ते झोपले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांनी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं सांगितलं. राजने मंदिराला हार्ट अटॅक येत असल्याचं सांगताच तिने त्यांचा मित्र आशिष चौधरीला लगेचच फोन केला. आशिष मंदिराच्या घरी पोहचला. मंदिरा आणि आशिषने तातडीने राजला गाडीत बसवलं आणि ते रुग्णालयात निघाले. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं.. पुढच्या ५-१० मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबल्याचं मंदिराच्या लक्षात आलं. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता.’

    राज कौशल यांना या आधी ते अवघ्या ३०-३२ वर्षांचे असताना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. तेव्हा पासूनच ते तब्येतीची काळजी घेत होते. असं सुलेमान यांनी या मुलाखतीत सांगितलं.