पतीच्या निधनानंतर अद्याप सावरली नाहीये मंदिरा, पुन्हा शेअर केली भावूक पोस्ट!

मंदिरा सोशल मीडियावर सक्रीय नव्हती. मात्र आत्ता मंदिरा राजसोबतच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेयर करत आहे

  अभिनेत्री मंदिरा बेदीची पती राज कौशलच्या अचानक निधनानंतर ती खूपच खचली आहे. सतत ती राजच्या आठवणीत काही नं काही पोस्ट करत असते. नुकताच मंदिराने एक पोस्ट शेयर करत राजसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मंदिराचा पती आणि दिग्दर्शक राज कौशलचं ३० जूनला निधन झालं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

  त्यांनतर मंदिरा सोशल मीडियावर सक्रीय नव्हती. मात्र आत्ता मंदिरा राजसोबतच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेयर करत आहे. राज गेल्यानंतर ही तिची तिसरी पोस्ट आहे. नुकताच मंदिराने पोस्ट शेयर करत राज आणि आपल्या नात्याच्या २५ वर्षांना उजाळा दिला आहे. यामध्ये आनंद आणि संघर्षसुद्धा आहे. मंदिराने राजच्या आठवणीत ३ पोस्ट शेयर केल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

  यामध्ये तिने एकमेकांना जाणून घेण्याच्या २५ वर्षांचा आणि लग्नाच्या २३ वर्षांचा उल्लेख केला आहे. मंदिराच्या या पोस्टवर तिचे कलाकार मित्र तिला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिरा बेदी फिलीफ्सच्या एका शोच्या ऑडीशनसाठी गेली होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा दिग्दर्शक राज कौशलशी भेट झाली होती. १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये या दोघांनी लग्न केल होतं.