पतीच्या निधनानंतर मंदिरा दुःखातून सावरण्याचा करतेय प्रयत्न, पहिल्यांदाच दिसली घराबाहेर!

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी अगदी कोलमडून गेली होती. इतकंच काय तर पतीचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असतानाच ती ढसाढसा रडली होती.

  अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं काही दिवसांपूर्वीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पती राज कौशल यांच्या  अचानक जाण्यामुळे मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला. हळूहळू मंदिरा बेदी आता या दुःखातून स्वतःला सावरतेय. पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंदिरा घराबाहेर पडली. रस्त्यावर चालत असतानाचा तिचा एक व्हिडीओ समोर आलाय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी अगदी कोलमडून गेली होती. इतकंच काय तर पतीचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असतानाच ती ढसाढसा रडली होती. नुकतंच ती तिच्या आईसोबत रस्त्यावर वॉक करताना दिसून आली. या व्हिडीओमध्ये तिने स्पोर्ट्स वेअर आणि चेहऱ्यावर मास्क परिधान करून आईसोबत बोलत रस्त्यावर चालत होती. पतीचा आधार गेल्यानंतर आता तिच्या दोन्ही मुलांसाठी ती पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतेय. पण तिच्यासाठी हे किती कठिण असेल याची कल्पना देखील करू शकणार नाही.

  अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत अभिनेत्री मंदिरा बेदी हिने तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. मंदिरा बेदीच्या पतीचं पार्थिव एका रूग्णवाहिकेमधून स्मशानभूमीकडे नेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. ती पूर्णवेळ डोळे भरुन राजकडे पाहात होती आणि रडत होती. ज्या पतीसोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती, त्याचं पार्थिव उचलताना मंदिराची खूप वाईट अवस्था झाली होती.