फेसबुकलाईव्ह करत अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, चाहत्याच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण!

फेसबुकच्या लाइव्ह दरम्यान सुवो म्हणाला,  तो हातात काम नसणे आणि वडिलांच्या मृत्यूमुळे तो त्रस्त होता. आपली चिंता व्यक्त करीत त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

    बंगाली अभिनेता सुवो चक्रवर्ती याने  चक्क फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने त्याला यातून वाचविण्यात आलं आहे. पोलिसांच्या यशस्वी प्रयत्नामुळे त्याला वाचविण्यात यश आलं आहे. त्यांने फेसबुकवर आत्महत्या करण्याचं कारण सांगितलं होतं. ते वैयक्तिक कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो चिंतेत होता, त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

    फेसबुकच्या लाइव्ह दरम्यान सुवो म्हणाला,  तो हातात काम नसणे आणि वडिलांच्या मृत्यूमुळे तो त्रस्त होता. आपली चिंता व्यक्त करीत त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टनुसार एक फेसबुक यूजरने फोनवर पोलिसांना संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. यानंतर कलकत्ता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुवो चक्रवर्तीचा जीव वाचवला.

    सुवोने आपल्या फेसबुक व्हिडीओचा टायटलमध्ये ‘आय क्विट’ लिहिलं होतं. व्हिडीओमध्ये पहिल्यांदा ते गिराट वाजवत होते. सोबतच गाणं गुणगुणत आहे. त्यानंतर ते होणारा त्रास शेअर करतात. प्रत्येकाच्या घरात ही समस्या आहे. माझी आई सांगते की, तिचा मुलगा ३१ वर्षांचा बेरोजगार आहे. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आम्ही पेन्शनच्या पैशांवर जगत आहोत.

    सुवो चक्रवर्तीने ‘मंगल चंडी’, ‘इराबोटिर चुपकोथा’, ‘मनासा’ सारख्या बंगाली मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मंगल चंडी’ गेल्या वर्षी ऑफ एयर झाला होता. ज्यानंतर सुवो चिंतेत होता.