‘शितली’ची काकी झालीय आता बोल्ड, या मालिकेत दिसतेय ग्लॅमरस भूमिकेत!

मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे

    सध्या वाहिन्यांवर अनेक नवीन मालिकांची चर्चा सुरू आहे. या मालिकांमधून काही नवीन तर काही जूने चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील एक मालिका म्हणजे पाहिले न मी तुला. या मालिकेत ‘मनु’ व ‘अनिकेत’ची प्रेमकहाणी आणि शशांक केतकरची खलनायकाची भूमिका आहे. या मालिकेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री.

    यापूर्वी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत ‘शितली’च्या ‘निलम काकी’चे पात्र साकारलं होतं. मंजुषा आता नवीन मालिकेत ग्लॅमारस ‘नीलम’ हे पात्र साकारताना दिसत आहे. ही अभिनेत्री यावेळी एका मॉडर्न लूकमध्ये दिसून येत आहे.

    मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे. सध्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत तिने साकारलेली ‘नीलम’ समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

    मंजुषाने ब्युटी काँटेस्ट पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये कोकण विभागातील अनेक स्पर्धेत विजेती ठरली होती. ‘मिस पश्चिम टाईम्स’, ‘मिस रत्नागिरी’, ‘मिस कोंकण’, ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ अशा अनेक स्पर्धेत आपल्या सौंदर्याची छाप पाडत मंजुषा विजेती ठरली होती. यातूनच पुढे येत तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.