‘द फॅमिली मॅन २’ आणखी एक प्रोमो मजेशीर, सोशल मीडियावर रंगली चर्चा!

‘द फॅमिली मॅन’ या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक पाहायला मिळणार आहे.‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती.

    सध्या सोशल मीडियावर ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता निर्माण झाली. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता ‘द फॅमिली मॅन २’चा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

    काय आहे व्हिडिओत

    सोशल मीडियावर ‘द फॅमिली मॅन २’हा मजेशीर प्रोमो चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये श्रीकांत तिवारी म्हणजेच अभिनेता मनोज वाजपेयी एक डेस्क जॉब करत असल्याचे दिसत आहे. त्याचा बॉस त्याच्यावर कामाचं प्रचंड प्रेशर टाकत आहे. त्याचा बॉस त्याला ‘मिनिमम गाय’ असे बोलून धारेवर धरत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

    ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक पाहायला मिळणार आहे.‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती.

    या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.