manoj tiwari

मालिका सर्वात भयावह व विचलित करणा-या गुन्‍ह्यांना सादर करेल, ज्‍यामधून प्रेक्षकांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान मिळेल आणि त्‍यांना रोमांचपूर्ण केसेस पाहण्‍याचा अनुभव मिळेल.

    आपल्‍या भारतीय संस्‍कृतीचे सार जागृत करणारा प्रत्‍येक पैलू, पात्र व कथांना प्रशंसित करणा-या विविध कन्‍टेन्‍ट व पटकथांसाठी प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा करण्‍यात आलेले चॅनेल एण्‍ड टीव्‍ही आता लक्षवेधक साप्‍ताहिक क्राइम मालिका ‘मौका-ए-वारदात’ सादर करण्‍यास सज्‍ज आहे. ही मालिका रहस्‍यमय गुन्‍हेगारी केसेसना दाखवेल, ज्‍या प्रेक्षकांच्‍या मनाला विचलित करतील आणि त्‍यांना ‘वास्‍तव कल्‍पनेपेक्षा अपरिचित आहे’ या वाक्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडतील.

    मालिकेमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय व प्रतिष्ठित व्‍यक्‍ती मनोज तिवारी सर्वात भयावह गुन्‍ह्यांची झलक दाखवताना पाहायला मिळणार आहे. मालिकेत सहयोगाबाबत बोलताना गायक, अभिनेता व राजकारणी मनोज तिवारी म्‍हणाले, ”माझी समाजामध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणणा-या आणि गुन्‍ह्यासारख्‍या गंभीर समस्‍येबाबत जागरूकतेचा प्रसार करणा-या मालिकेचा भाग असण्‍याची इच्‍छा होती. मला एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘मौका-ए-वारदात’साठी विचारण्‍यात आले तेव्‍हा मला ही मालिका अगदी योग्‍य व्‍यासपीठ वाटले. मालिकेमध्‍ये वैविध्‍यपूर्ण कन्‍टेन्‍ट आहे आणि मालिका अत्‍यंत लक्षवेधक आहे.

    मालिका सर्वात भयावह व विचलित करणा-या गुन्‍ह्यांना सादर करेल, ज्‍यामधून प्रेक्षकांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान मिळेल आणि त्‍यांना रोमांचपूर्ण केसेस पाहण्‍याचा अनुभव मिळेल. गुन्‍हेगारी विश्‍व नवीन क्‍लुप्‍त्‍या व पद्धतींसह अद्ययावत होत आहे आणि लोकांना धोक्‍याची चाहूल जाणवण्‍याची आणि त्‍याबाबत दक्ष असण्‍याची गरज आहे. आम्‍ही ही मालिका लक्षवेधक व संबंधित करण्‍यासाठी अथक मेहनत घेतली आहे. आम्‍ही आशा करतो की, प्रेक्षक कन्‍टेन्‍टचे कौतुक करतील.”