दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव कोरोना पॉझिटिव्ह, रूग्णालयात दाखल, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती!

यातच आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

    देशातील कोरोनाचं सावट बॉलिवूडकरांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीवरही पडलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे.  गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    यातच आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

    कोरोनाच्या संसर्गाचा फटका मनोरंजन क्षेत्रालादेखील बसतोय. आलिया भट्ट, अक्षय कुमारला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला आहे, ” मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी करोना चाचणी पॉझिविव्ह आली. सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या. ” अशी पोस्ट करत प्रियदर्शनने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी चिंता व्यक्त करत काळजी घेण्यास सांगितलं आहे.