mahajani gashmeer

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच एका अ‍ॅक्शन सिरीजमध्ये झळकणार आहे. या अ‍ॅक्शन सिरीजचे नाव श्रीकांत बशीर असून सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'श्रीकांत बशीर' हा अ‍ॅक्‍शन पॅक ड्रामा आहे. ही सिरीज दोन अधिकारी श्रीकांत आणि बशीर यांच्‍या अवतीभोवती फिरते. ते शहराचे घातक विषाणूपासून संरक्षण करण्‍यासाठी काळाविरोधात लढतात. या सिरीजमध्‍ये गश्‍मीर महाजनी व युधिष्ठिर सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्‍या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच एका अ‍ॅक्शन सिरीजमध्ये झळकणार आहे. या अ‍ॅक्शन सिरीजचे नाव श्रीकांत बशीर असून सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘श्रीकांत बशीर’ हा अ‍ॅक्‍शन पॅक ड्रामा आहे. ही सिरीज दोन अधिकारी श्रीकांत आणि बशीर यांच्‍या अवतीभोवती फिरते. ते शहराचे घातक विषाणूपासून संरक्षण करण्‍यासाठी काळाविरोधात लढतात. या सिरीजमध्‍ये गश्‍मीर महाजनी व युधिष्ठिर सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्‍या आहेत.

अनेक कलाकार स्‍टण्‍ट्स व अ‍ॅक्‍शन सीक्‍वेन्‍सेससाठी बॉडी डबलचा उपयोग करण्‍याला प्राधान्‍य देतात, तर काही कलाकार अधिक मेहनत घेऊन स्‍वत:हून स्‍टण्‍ट्स करतात. आगीशी संबंधित सीक्‍वेन्‍स ते डुप्लिकेटचा वापर केल्याशिवाय दुमजली इमारतीवरून उड्या मारण्‍यापर्यंत आणि बाइक चेस सीक्‍वेन्‍स करण्‍यापर्यंत सर्व अ‍ॅक्‍शन्‍स दोन्‍ही कलाकारांनी स्‍वत:हून केले आहेत. ज्‍यामुळे ‘श्रीकांत बशीर’ ही पाहिलीच पाहिजे अशी अ‍ॅक्‍शन सिरीज आहे. या दोन कलाकारांव्‍यतिरिक्‍त एसओटी येथील आयटी तज्ज्ञ रवीनाची भूमिका साकारणारी पूजा गो देखील शोमध्‍ये काही धाडसी स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे.

 

श्रीकांतची भूमिका साकारणारा गश्‍मीर महाजनी या अनुभवाबाबत बोलताना म्‍हणाला, ”एक सीन होता, ज्‍यामध्‍ये युधिष्ठिर आणि मला दुमजली इमारतीवरून उडी मारायची होती. या सीनमध्‍ये मानसिक व शारीरिक संतुलन राखणे गरजेचे होते, ज्‍यामुळे आम्‍हाला आधी काहीशी भीती वाटली. पण सीनमध्‍ये वास्‍तविकतेची भर करण्‍यासाठी आम्‍ही सर्व सुरक्षितता व खबरदारींसह हार्नेसचा आधार न घेता सीन करण्‍याचे ठरविले. सुदैवाने आम्‍हा दोघांना कोणतीच दुखापत झाली नाही आणि सीनदेखील उत्तम झाला. ज्‍यामुळे आम्‍हाला पडद्यावर हा सीन पाहताना खूप अभिमान वाटेल. श्रीकांत बशीर वेबसिरीजमध्ये गश्‍मीर महाजनी व युधिष्ठिर सिंग व्‍यतिरिक्‍त पूजा गोर, मंत्रा, अष्मिता जग्‍गी असे प्रतिभावान कलाकारदेखील आहेत.