‘हा’ मराठी अभिनेता झाला ‘बाबा’,सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती

श्रीकरने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने एक गोड बातमी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. श्रीकर नुकताच बाबा झाला आहे. अभिनेता श्रीकर पित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shrikar Pitre (@shrikarpitre)

    आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला मुलगा झाल्या असल्याचं कळवलं आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल अशा पाहुण्याचं स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे”, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shrikar Pitre (@shrikarpitre)

    श्रीकरने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे. ‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा काही मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shrikar Pitre (@shrikarpitre)