अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला बालपणीचा डान्स Video, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव!

प्राजक्ताने ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पण तिला खरी प्रसिद्धी ही ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.

  अभिनेत्री प्रजाक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिच्या भाचीचे ही फोटो शेअर करते या फोटोलाही चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. आता प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

  या व्हिडीओत प्राजक्ता ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या बालपणीचा आहे. “जेव्हा मी काडीपैलवान होते आणि सीडी बघून हुबेबुब डान्स करण्याचा प्रयत्न करायचे,” असे गंमतीशीर कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडीओला दिलं आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

  प्राजक्ताने ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पण तिला खरी प्रसिद्धी ही ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने मेघना देसाईची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर प्राजक्ताला ‘खो-खो’, ‘हंपी’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात काम केली आहेत. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोचे सुत्रसंचालन करत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)