मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन, सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरेमध्ये साकारली होती भूमिका!

सुशांत सिंग रजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या चित्रपटात देखील त्या एका छोट्याशा भूमिकेत दिसल्या होत्या.

    बापमाणूस या मालिकेत त्या पल्लवी पाटीलच्या आईच्या भूमिकेत  झळकलेल्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अभिलाषा पाटील चित्रीकरणासाठी काही दिवसांपूर्वी बनारसला गेल्या होत्या. पण तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे हे कळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले चार दिवस त्या आयसीयुत होत्या. पण काल त्यांची प्राणज्योत मालवली.

    खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. baapmanus ला आपण भेटलो होतो… आई होतीस माझी. . ” नुसतं enjoy” असं म्हणून काम…

    Posted by Pallavi Ajay on Tuesday, May 4, 2021

    त्यांनी प्रवास या चित्रपटात देखील काम केले होते. तसेच बायको देता का बायको या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या. तसेच सुशांत सिंग रजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या चित्रपटात देखील त्या एका छोट्याशा भूमिकेत दिसल्या होत्या.

    अभिलाषा पाटील यांच्या निधनाचा मराठी चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसला आहे. पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.