hruta durgule

दूर्वा , फुलपाखरु सारख्या सुपरहिट मालिका , सिंगिंग स्टार सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि स्ट्रॉबेर्री शेक सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे सारखे एक दर्जेदार नाटक या मधून नावारुपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री [blurb content=""]ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आज  आम्ही तुम्हाला अभिनेत्री ऋता दुर्गुळे  बद्द्ल एक न्यूज अपडेट देणार आहोत .

दूर्वा , फुलपाखरु सारख्या सुपरहिट मालिका , सिंगिंग स्टार सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि स्ट्रॉबेर्री शेक सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे सारखे एक दर्जेदार नाटक या मधून नावारुपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री

ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आज  आम्ही तुम्हाला अभिनेत्री ऋता दुर्गुळे  बद्द्ल एक न्यूज अपडेट देणार आहोत .

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

 

अभिनेत्री  ऋता दुर्गुळे ही सध्या पुण्यात असून तिचे शूटिंग जोरदार सुरु आहे . तिने आजवर दूर्वा , वैदेही , मन्या अशा वेगवेगळ्या भूमिका अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत आणि आता ती तिच्या चाहत्यांसाठी अदिती ही  एक नविन भूमिका घेऊन येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्ट्रॉबेर्री शेक चे दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर  यांच्या सोबत ओपनिंग फ्रेम मिडिया प्रोडक्शन द्वारे ती पुन्हा शूट करत आहे . इतकेच नव्हे तर स्ट्रॉबेर्री शेक ची बाकीची टीम सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे . कलाकार ऋता दुर्गुळे  , दिग्दर्शक शोनील  यल्लत्तीकर , DOP लौकिक जोशी , प्रोडक्शन डिझाइनर कमलेश कळसुलकर आणि संगीत दिग्दर्शक  निषाद गोलांबरे हे  सर्व मिळून पुन्हा काहीतरी नविन भन्नाट घेऊन येणार हे सांगायची गरज नाही.

अदितीची भूमिका देण्याबद्दल तिने तिचे दिग्दर्शक शोनील  यल्लत्तीकर यांचे  सोशल मीडिया वर आभार सुद्धा मांडले आहेत . थोडक्यात सांगायचे झाले तर स्ट्रॉबेर्री शेकच्या टीम चे रियुनियनच या सेट वर झाले आहे .मात्र तिच्या चाहत्यांना एवढाच प्रश्न पड़ला आहे की  हे शूट तिच्या येणाऱ्या नविन फिल्मचे आहे , short फिल्मचे आहे की एखाद्या मोठ्या OTT  प्लेटफार्म साठी  आहे. अजूनतरी ही न्यूज गुलदसत्यात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)