अर्जुन रामपाल गेला देशाबाहेर, एनसीबी करणार कारवाई!

बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीतर्फे बड्या स्टार्सची चौकशी सुरू असतानाच अभिनेता अर्जुन रामपालच्या अडचणीत मात्र वाढ होणार असल्याची शक्यता दिसत आहे. चौकशी सुरू असतानाच अर्जुन रामपाल देश सोडून गेल्याचे सांगितले जाते. एनसीबीने 16 डिसेंबरला उपस्थित राहण्यास सांगितलं पण अर्जुन चौकशीसाठी उपस्थित नव्हता.  आपल्या वकिलाच्या माध्यमातून त्याने 22 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. पण अर्जुन रामपाल सध्या काही कामासाठी लंडनमध्ये गेल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरून एनसीबी आता त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनेक कलावतांना नोटिस

एनसीबीच्या चौकशीदरम्यान देश सोडून जाणारा अर्जुन रामपाल एकमेव नाही. याआधी अभिनेत्री सपना पब्बीला देखील नोटीस मिळाल्यानंतर ती लंडनमध्ये गेली होती. आपण एनसीबीला माहिती देऊन परदेशी गेल्याचे तिने स्पष्ट केले होते.  दिग्दर्शक करण जोहर याला देखील एनसीबीने नोटीस पाठवली आहे. करण जोहर, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सपना पब्बी, अर्जुन रामपाल, त्याची प्रेयसी गॅब्रिएलालाही एनसीबीने नोटीस पाठवली आहे. उल्लेखनीय असे की, अर्जुन रामपालचा ‘नेल पॉलिश’ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.