“तू बुधवार पेठेतील ** आहेस”, म्हणणाऱ्याला मानसी नाईकने दिलं सडेतोड उत्तर म्हणाली….

मानसी नाईक काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यावेळीही तिला लग्नावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा मिळाला नाही का? असा प्रश्न विचारुन तिला बेजार करण्यात आलं होतं.

  सेलिब्रेंटींना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आपल्यावरील ट्रोलिंगला कलाकार खुलेपणाने उत्तर देतात. नुकतच मानसी नाईकने आपल्याला सोशल मीडियावर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. मानसी नाईकच्या एका फोटोवर एका युजरने “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी शिवराळ कमेंट केली होती. त्याला मानसी नाईकने सडेतोड उत्तर दिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

  मानसी नाईक यावर म्हणता ना म्हणाली, “मला हसूही आलं आणि वाईटही वाटलं, की त्याने हे लिहिताना दोनदा विचारही नाही केला.” असं मानसी म्हणाली. ‘बुधवार पेठेतील मी आहे हे समजायला, तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? दुसरी गोष्ट, बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात, तुम्हाला काय वाटतं, त्या तिथे का आहेत? त्या स्वतःचं पोट भरण्यासाठी ते काम करतात. त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्या मेहनत करतात, हा विचार न करतात ती एक शिवी म्हणून अभिनेत्रीला वापरता’ असे म्हणत मानसीने त्याला झापलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

   

  मानसी नाईक काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यावेळीही तिला लग्नावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा मिळाला नाही का? असा प्रश्न विचारुन तिला बेजार करण्यात आलं होतं.