लग्नानंतर मितालीच्या बोल्ड आणि मादक अदा, फोटो पाहून सेलेब्रेटीही फिदा!

मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कौस्तुरी ही भूमिका साकारतेय. तर सिद्धार्थ स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

    २४ जानेवारीला सिद्धार्थ आणि मितालीचा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. लग्न झाल्यानंतरही मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मिताली अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. लग्नानंतर मितालीच्या लग्नातील वेगवेगळ्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. आता मितालीने नव्याने अपलोड केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे.

    नुकताच मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मितालीचा लाल साडीतील हॉट लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कुरळे केस असा मितालीचा बोल्ड अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत. काही तासातच मिलातीच्या या फोटोला हजारो लाईकस् मिळाले आहेत.

    मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कौस्तुरी ही भूमिका साकारतेय. तर सिद्धार्थ स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.