
मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का असा सवाल यावेळी कलाकारांनी उपस्थित केला.
कलर्स मराठीवरील हे मन बावरे ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या तो पोस्टमुळे पडद्यामागची परिस्थिती प्रेक्षकांसमोर आली आहे.
या मालिकेतील कलाकार म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, अभिनेता संग्राम समेळ, या कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्याविरोधात आवाज उठवला आहे. या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे.
View this post on Instagram
कलाकारांनी काय म्हटलय पोस्टमध्ये
“गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅलनने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, मंदार देवस्थळी त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”, असं म्हणत शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का असा सवाल यावेळी कलाकारांनी उपस्थित केला.
मंदार देवस्थळी यांच्या गाजलेल्या मालिका
‘बोलाची कढी’, ‘नातीगोती’,’सांगाती’, ‘वळवाचा पाऊस’, ‘मानामनाची व्यथा’, ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’,’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’,’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’,’गुलमोहर’,’सूर राहू दे’, ‘हे मन बावरे’.