तीन महिन्यांपूर्वी ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर मागितलेलं काम, आता बनलीये मोठी उद्योजिका!

अभिनयाशिवाय इतरही क्षेत्रात सक्रिय असणारे बरेच कलाकार मराठी कलाविश्वात आहेत.

    अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.`आजपर्यंत शाश्वतीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केली आहेत. शाश्वतीने  ‘चाहूल’, ‘सिंधू’ आणि ‘पक्के शेजारी’ या मालिकांमध्ये कामं केली आहेत. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली होती.

    शाश्वतीने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, ‘नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करु इच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा..’ अशी पोस्ट शाश्वतीने लॅाकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर शेअर केली होती.

    नुकताच शाश्वतीने स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. ‘मुदपाकखाना’ चव तीच… आपल्या घरची! असं तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे. चाहत्यांनी शाश्वतीचे कौतुक केले असून तिला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनयाशिवाय इतरही क्षेत्रात सक्रिय असणारे बरेच कलाकार मराठी कलाविश्वात आहेत.

     

    शाश्वतीने रवी जाधव यांच्या ‘बालक पालक’ चित्रपटात ‘डॉली’ ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. गेल्या वर्षी शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमकरशी लग्नगाठ बांधली.