श्वेताच्या मॉडर्न लुकवर चाहते झाले फिदा, सोशल मीडियावर होतेय फक्त तिच्याच लूकची चर्चा!

मालिकेत श्वेता साडीमध्ये सुंदर दिसतेच पण खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस देखील आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील काही फोटोज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

  झी युवा वरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

  मालिकेत श्वेता साडीमध्ये सुंदर दिसतेच पण खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस देखील आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील काही फोटोज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या आऊटफिटमध्ये श्वेताच सौंदर्य खुलून आलं आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मालिकेतील तिच्या साडीच्या लुकप्रमाणेच तिच्या मॉडर्न लूकवर देखील चाहते पूर्णपणे फिदा झाले आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.