कधी साडीत मर्दानी खेळ तरी कधी घोडे स्वारी, तर आता या पारूचा बैल गाडी हाकतानाचा Video होतोय व्हायरल!

नुकतचं स्मिताने बैलगाडी हाकत एक फोटो शूट केलं आहे. मराठमोळ्या अंदाजात स्मिता बैलगाडी हाकत असल्याचं या फोटोत दिसतंय. या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.

  पप्पी दे पप्पी दे पारूला असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर.स्मिता गोंदकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि नवनवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. तिच्या प्रत्येक लुकचं सोशल मीडियावर कौतुक होतं. नुकताच स्मिताने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बैलगाडी चालवताना दिसत आहे. स्मिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या आधीही स्मिताने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती मर्दानी खेळ खेळताना दिसली. विशेष म्हणजे साडीत ती हा खेळ खेळताना दिसते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

  नुकतचं स्मिताने बैलगाडी हाकत एक फोटो शूट केलं आहे. मराठमोळ्या अंदाजात स्मिता बैलगाडी हाकत असल्याचं या फोटोत दिसतंय. या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. तर या फोटोशूट दरम्यान बैलगाडी हाकत असतानाचा एक व्हिडीओ स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. स्मिताने या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये म्हंटलंय, “शूटिंगमुळे अनेक नव्या गोष्टी अनुभवता येतात आणि या शूटमुळे मला माझं बैलगाडी चालवण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं.” स्मिताच्या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

  या आधी साडीत मर्दानी खेळ

  स्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसत मर्दानी खेळाची एक झलक दाखवली. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिलं की, ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, भीत नाही कोणाला..! कर्तृत्वा संगे धैर्य दिलं राजांनी आमच्या जगण्याला ! मागे हटणार नाही, लाख संकटे आली तरी झुकणार नाही..!’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)