प्रिया बापट- उमेश कामतला कोरोनाची लागण, नुकताच पार पडला होता नाटकाचा प्रयोग!

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती.

  बॉलिवूडमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. यात रणबीर कपूर,मनोज वाजपेयी,संजय लीला भन्साळी त्यानंतर तारा सुतारीया या कलकारांना कोरोनाची लागण झाली. आता मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द उमेशनेच त्याच्या इंस्टा स्टोरीवर ही माहिती दिली आहे.

  उमेश कामत आणि प्रिया बापटने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. उमेशने लिहिले की,  दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

   

  उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. त्याचबरोबर प्रिया बापटीची निर्मिती असलेले आणि उमेश कामतची मुख्य भुमिका असलेले दादा एक गुड न्यूज आहे. या नाटकाचेही प्रयोग दणक्यात सुरू आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)