सध्या तरूणाईंच्या मनातला कारभारी असणारा हा मराठी अभिनेता पुन्हा पडला प्रेमात, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘डार्लिंग’ या आगामी चित्रपटाची. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता निखील चव्हाण रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ‘डार्लिंग तू’ हे धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यानंतर आता आणखी एक नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘डार्लिंग तू’ नंतर आता ‘ हैं प्यार’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात पुन्हा एकदा निखील आणि रितिका श्रोत्रीची जोडी झळकली आहे. त्यासोबत अभिनेता प्रथमेश परबदेखील या गाण्यात दिसून येत आहे. फिल्मी अंदाजात हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून हे गाणं गीतकार मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून साकारलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

दरम्यान, समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंगमधील या गाण्याला चिनार-सोनाली ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील ‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.