मला कोणालाही फसवायचं नाही….पैसे थकवल्याच्या कलाकारांच्या आरोपावर मंदार देवस्थळी यांच उत्तर!

कलर्स मराठीवरील हे मन बावरे ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या तो पोस्टमुळे पडद्यामागची परिस्थिती प्रेक्षकांसमोर आली आहे.

    छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. ‘मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे.

    मंदार देवस्थळी म्हणाले…

    नमस्कार,मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय,मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे,माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच payment थकलं आहे,,तुमच म्हणणं योग्यच आहे,तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात,पण मी सुध्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती मधून जात आहे,मला खूप loss झाला आहे,त्यामुळे आत्ता पैसे देण्याची माझी खरच परिस्थिती नाही पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन अगदी टॅक्स सकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे,कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही तशी माझी इच्छा ही नाही,पण आत्ता माझ्यावर सुध्दा आर्थिक संकट कोसळलय,मी खरच वाईट माणूस नाही माझी परिस्थिती वाईट आहे,मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय,देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना…आत्तापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे,आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

     

    काय आहे कलाकारांची तक्रार

    कलर्स मराठीवरील हे मन बावरे ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या तो पोस्टमुळे पडद्यामागची परिस्थिती प्रेक्षकांसमोर आली आहे.

    या मालिकेतील कलाकार म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, अभिनेता संग्राम समेळ, या कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्याविरोधात आवाज उठवला आहे. या कलाकारांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे.

    कलाकारांनी काय म्हटलय पोस्टमध्ये

    “गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅलनने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, मंदार देवस्थळी त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”, असं म्हणत शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

    मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का असा सवाल यावेळी कलाकारांनी उपस्थित केला.