जेनेलिया, स्वप्नील आणि सोनालीचा  ‘# मास्क बनाओ मुव्हमेंट’मध्ये सहभाग

मुंबई : भारत कोविड-१९ महामारीचा सामना करण्‍यासोबत अर्थव्‍यवस्‍था पुन्‍हा सुरू करण्‍याच्‍या निर्णयासह स्‍थानिक नागरिकांनी मास्‍क परिधान करणे हा

 मुंबई : भारत कोविड-१९ महामारीचा सामना करण्‍यासोबत अर्थव्‍यवस्‍था पुन्‍हा सुरू करण्‍याच्‍या निर्णयासह स्‍थानिक नागरिकांनी मास्‍क परिधान करणे हा त्‍यांच्‍या रोजच्‍या जीवनाचा आवश्‍यक भाग बनला आहे. जेमिनी सनफ्लॉवर या ऑईल ब्रॅण्‍डने  ‘#मास्‍क बनाओ मुव्‍हमेंट’ सादर केली आहे ज्यात जेनेलिया देशमुख, सोनाली कुलकर्णी, स्वप्निल जोशी यांनी सहभाग घेतला आहे. जेमिनीची ‘वक्‍त कुछ औरो के लिए बनाने का’ मोहिम ही एक रॅली आहे, जी प्रत्‍येकाला समुदायामध्‍ये मास्‍क्सचा अभाव असलेल्‍या लोकांप्रती मास्‍कचे योगदान देण्यासाठी तसेच मदतीचा हात पुढे करण्‍यास प्रोत्‍साहित करते. 

ही तीन आठवड्यांची मोहिम १२ जूनला सुरू होऊन ३ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्‍याच्‍या उद्देशाने जेमिनी सनफ्लॉवर ऑईल मुंबई व पुण्‍यातील पूर्ण केलेले मास्‍क गोळा करण्‍याकरिता कन्‍सर्न इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोगाने काम करत आहे. ग्राहक www.geminicookingoil.com या संकेतस्‍थळावर लॉगइन करू शकतात, जेथे त्‍यांना ईजी डू-इट-युअरसेल्‍फ पायऱ्यांच्या माध्‍यमातून घरामध्‍येच मास्‍क कशाप्रकारे बनवावेत याची माहिती मिळू शकते आणि ते मास्‍क्‍स गोळा करण्‍यासाठी त्‍यांच्‍या लोकेशनची सविस्‍तर माहिती शेअर करू शकतात. हे मास्‍क्स घरामधून गोळा करण्‍यात येतील. मोहिमेच्‍या शेवटी गोळा करण्‍यात आलेले सर्व मास्‍क्‍स कन्‍सर्न इंडिया फाऊंडेशनद्वारे सॅनिटाईज करण्‍यात येतील आणि सर्वात जास्त गरज असलेल्‍या समुदायातील लोकांना दान करण्‍यात येतील.या ‘#मास्‍क बनाओ मुव्‍हमेंट’ मोहिमेत जेनेलिया देशमुख, सोनाली कुलकर्णी, स्वप्निल जोशी यांनी मास्‍क्‍स बनवण्‍याच्‍या आणि संदेश पसरवण्‍याच्‍या उद्देशाने सक्रिय सहभाग घेतला आहे.