master movie

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बेल्टमध्ये 'मास्टर'ने साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याचबरोबर उर्वरित देशातील दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्वा व्यतिरिक्त या चित्रपटाने परदेशी बाजारपेठेतून ४ कोटींची कमाई केली आहे.

लॉकडाऊनमुळे बंद असलेली सिनेमागृह आता हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागली आहेत. अलिकडेच टेनेट आणि वंडर वुमन १९८४ या हॉलिवूडपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा मास्टर हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गर्दीनं लॉकडाउनच्या नियमांचं देखील उल्लंघन केलं.

 

दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार थालापथी विजय आणि विजय सेतुपति स्टारर अ‍ॅक्शन-थ्रीलर फिल्म ‘मास्टर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सलामी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात ४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कोरोना काळातील हा पहिला चित्रपट आहे, ज्याला अशा बंपर ओपनिंग मिळालय. लोकेश कानगराज दिग्दर्शित हा चित्रपट बुधवारी तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला.

 

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बेल्टमध्ये ‘मास्टर’ने साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याचबरोबर उर्वरित देशातील दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्वा व्यतिरिक्त या चित्रपटाने परदेशी बाजारपेठेतून ४ कोटींची कमाई केली आहे.

मास्टरच्या प्रदर्शनानंतर व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सोशल मीडियावर लिहिले की, “बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आली आहे.” मास्टरला एक जबरदस्त सुरुवात झाली आहे.