नंदेश विठ्ठल उमप यांच्या आवाजात ‘माझा गणोबा’!

याशिवाय भक्तीरंगात न्हालेली आषाढीवारीवरील त्यांची एक रचना युवागायिका कार्तिकी गायकवाडच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे.

    यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रिया क्रिएशन निर्मित ‘माझा गणोबा’ हे गणपती बाप्पाला वाहिलेलं अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीला आलं आहे. गीतकार वर्षा राजेंद्र हुंजे यांनी हे गाणं पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमपनं हे गाणं गायलं आहे. वर्षा या मागील काही वर्षांपासून गीतांसोबत गझललेखनही करतात. यापूर्वीही वर्षा यांनी बऱ्याच कविता, गझल लिहिल्या आहेत. त्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

    याशिवाय भक्तीरंगात न्हालेली आषाढीवारीवरील त्यांची एक रचना युवागायिका कार्तिकी गायकवाडच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. त्यांची एक गझल काही दिवसांतच रसिकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा हुंजे यांनी बाप्पाला ‘माझा गणोबा’ या गाण्यातून साकडं घातलं आहे. या गाण्यातून बाप्पाकडे सुखाचं दान मागण्यात आलं आहे.

    गणेशोत्सवावर कुठलंही संकट आलं तरी विघ्नहर्ता बाप्पा नेहमीच अशी संकटं निवारण करत आला आहे. या गाण्याचं संगीत संयोजन आणि संगीत नंदेशनं केलं आहे. हे गाणं नंदेशच्या ऑफिशियल युट्युब चॅनल आणि श्रिया क्रिएशनच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे.