‘माझा होशील ना’ च्या सेट वर रंगली आमरस आणि मिसळ पार्टी,  बघा कलाकारांची धम्माल!

जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.

    सध्या कॉरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही आहे. झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका ‘माझा होशील ना’चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे. जवळपास एका महिन्याच्या वर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत. जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.

    नुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस पार्टी केली. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. सेटवर आमरसचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपुन टीमने काही मिनिटातच या आमरसचा फडशा पडला. या खास आमरस पार्टीची क्षणचित्रं या मालिकेच्या चाहत्यांसाठी.