‘सिंपल गर्ल’ मीरा झळकणार ‘या’ हिंदी वेब सिरीजमध्ये!

समीत कक्कड दिग्दर्शित ही नऊ भागांची वेब सिरीज आहे. लेखक कुणाल मराठे यांच्या ‘थर्की’ या पुस्तकावर आधारित आहे.

  अभिनेत्री मीरा जोशी आता हिंदी वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. १० जूनपासून ‘एमएक्स प्लेयर’वर भेटीला येणाऱया ‘इंदोरी इश्क’ या केब सिरीजमध्ये ती ‘सिंपल गर्ल’च्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्काचं म्हणजे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन देऊन तिची या भूमिकेसाठी निवड झाली आहे. लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी ऑडिशन दिल्यानंतर मीराची यासाठी निवड करण्यात आली. समीत कक्कड दिग्दर्शित ही नऊ भागांची वेब सिरीज आहे. लेखक कुणाल मराठे यांच्या ‘थर्की’ या पुस्तकावर आधारित आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

  आपल्या भूमिकेबद्दल मीरा म्हणाली, ‘‘आलिया ही प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार न करता प्रेमात रमणारी मुलगी आहे. तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर टिपिकल बाबू, शोना झोनमधली ती मुलगी आहे. ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात कुणालची एंट्री होते. पुढे तिचं आयुष्य तिला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतं, त्यांचं नातं पुढे टिकेल का, हे तुम्हाला केब सिरीजमधून पाहायला मिळेल.’’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

  आलिया ही सर्वसामान्य तरुणी आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. लूकच्या बाबतीत सांगायचे तर माझा ओरिजनल लूक यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदी माझी हेअरस्टाईलदेखील ऑफक्रीन असते तशीच इंदोरी इश्कमध्ये आहे, असे मीराने सांगितले.